पुण्यात दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी आज फिरते हौद अनुपलब्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी आज, महापालिकेने आवश्यक तयारी केली असून, फिरत्या हौदांची व्यवस्था उपलब्ध नसणार आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४६ बांधलेले हौद, १७७ ठिकाणी ३५९ लोखंडी हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी सार्वजनिक स्वच्छता, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशकांची फवारणी, विसर्जन घाटावर अग्निशमन दल कर्मचारी; तसेच अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.

मागील दोन वर्षे शहरात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने विसर्जन घाटांवर नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी फिरत्या हौदांची व्यवस्था केली होती. यंदा मात्र, करोनाची साथ आटोक्यात असताना आणि नागरिकांकडून कोणतीही मागणी नसताना महापालिकेने १५० फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. याशिवाय क्षेत्रीय कार्यालयांमार्फतही काही फिरत्या हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. महापालिकेने १५० फिरत्या हौदांसाठी एक कोटी ३५ लाखांची निविदा काढली आहे.

फिरत्या हौदांसाठी एक कोटी ३५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या निविदांची छाननी मंगळवारी करण्यात आली. त्यानंतर सर्वांत कमी निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला हे काम द्यायचे का, याबाबत आज, गुरुवारी निर्णय घेण्यात येणाक आहे. त्यामुळे हौद तयार करणे, त्यांवर ‘जीपीएस’ बसवून कार्यान्वित करण्याचे काम तीन दिवसांत शक्य झाल्यास पाचव्या दिवशीच्या विसर्जनासाठी फिरते हौद उपलब्ध होऊ शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *