ढोल-ताशांचा नाद : पुण्यात सर्वाधिक 120 पथके ; पथकांना तासानुसार मानधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ सप्टेंबर । बाप्पाचे स्वागत, आरती व विसर्जन मिरवणुका यांचे वातावरण भारावून टाकतात ती ढोल-ताशा पथके. पुण्याचा झांज, नाशिकचा ढोल, मुंबईचा ताशा अन् या तालावर फेटे व रंगीबेरंगी साड्यांसह सजलेले स्वयंसेवक गणेशोत्सवात चैतन्य आणतात. राज्यात ढोलपथकांची या उत्सवातील उलाढाल ५०० कोटींच्या घरात आहे.

प्रत्येक पथकातील वाद्य आणि इतर गाेष्टींवरचा खर्च ढोल : 2800 ते 5000 रुपये प्रत्येकी (100 च्या पथकाला 40-50 ढोल) ताशे : 1000 ते 7500 रुपये प्रत्येकी (पथकामागे 15 ताशे) टोल : 3800 ते 4000 टोल गाडी : 15,000-40,000 ध्वज : 500 ते 2000 (प्रत्येक पथकात 11,21 याप्रमाणे) ध्वज कळस : 200 ते 2500 (स्टील ते पितळ यानुसार) ढोलची पाने : 550 ते 750 रुपये झांज : 800 ते 1500 रु. जोडी

पथकांना तासाला १५ ते २५ हजार बिदागी गणेश मंडळे पथकांना तासानुसार मानधन देतात. पुणे, नाशिक व नागपुरातील पथके तासाला २५ हजार; अकोला औरंगाबाद, सोलापूर २० हजार; जळगाव, अमरावती, कोल्हापुरात १५ हजार यानुसार मानधन ठरले आहे. मोठी मंडळे ३ ते ५ तासांसाठी पथके बुक करतात. प्रत्येक पथकास ७ ते १२ सुपाऱ्या मिळाल्या आहेत. प्रत्येक पथकाची यंदाची उलाढाल पाच लाखांपासून २० लाखांपर्यंत गेली आहे.

पुण्यात सर्वाधिक म्हणजे १२० पथके असून प्रत्येक पथकात १०० ते ६०० स्वयंसेवक आहेत. त्याखालोखाल जळगावमध्ये ४५, नाशिकमध्ये ४०, नागपुरात २५ अशी ढोलपथके आहेत. सर्वच पथकांनी साधारण महिना-दीड महिना आधीपासून सराव केला आहे. सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला या शहरांमध्ये खुल्या मैदानावर हा सराव करण्यात आला तर पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील काही पथकांना सरावासाठी भाड्याने हॉल घ्यावे लागले. त्यांचा खर्च ५ ते ५० हजारांचा होता. यंदा बहुतांश पथकांनी ५०० रुपयांची सदस्य नोंदणी केली आहे. लहान शहरांमध्ये हे शुल्क ३०० रुपये आहे, तर मोठ्या शहरांमध्ये ७०० रुपये.

महिलांचा लक्षणीय टक्का : आकर्षक व एकरंगसंगत वेशभूषा हे ढोलपथकांचे वैशिष्ट्य. बहुतांश पथके आपापला ड्रेस कोड ठरवत असून त्यासाठी प्रति स्वयंसेवक ५०० रुपयांपासून २ हजारांपर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. मोठ्या शहरांमधील पथके स्वयंसेवकांसाठी खास ड्रेस डिझाइन करून घेतात, तर लहान शहरातील पथके सफेद कुर्ते, लाल दुपट्टे, भगवे फेटे असा ड्रेस कोड सांगतात. विशेष म्हणजे सर्वच पथकांमध्ये महिलांचा सहभाग सरासरी ४० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यांच्यासाठी नऊवारी साडी, नथ, फेटा हा मोठा ट्रेंड बनला आहे.

असे असते पथकांचे व्यवस्थापन – एका पथकात 50 ते 200 स्वयंसेवक – 30 ते 45 दिवसांचा सराव – मोकळ्या मैदानावर किंवा भाड्याच्या हॉलमध्ये – त्याचे भाडे 5 ते 50 हजार – वाद्यांसाठी 2 लाखांची खरेदी, 50 हजार दुरुस्ती – वेशभूषेसाठी प्रत्येक स्वयंसेवकामागे 500 ते 2 हजार रु. – 500 रुपये नोंदणी शुल्क, बहुतांश ठिकाणी मोफत – मानधन ताशी 15 हजार ते 25 हजार रुपये – सरासरी 7 ते 15 सुपाऱ्या, 1 ते 3 तास वादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *