महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ सप्टेंबर । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. आता ही गळती थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देत आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातही युवा सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला. युवासेनेच्या तालुका प्रमुखासह शहर प्रमुखांनी राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. (Karmala Yuvasena Latest News)
युवा सेनेचे करमाळा तालुका प्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्यासह 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देवून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांच्या तडजोडीच्या राजकारणाला कंटाळून आपण युवा सेनेच्या पदाचे राजीनामे देत असल्याचे युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी सांगितले. (Karmala Todays News)
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कडवट शिवसैनिक आहोत. यापुढे ही यांचे विचार घेवून काम सुरू ठेवणार असल्याचंही विशाल गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर आता हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.