महाराष्ट्र २४ ऑनलाईन -। विशेष प्रतिनिधी । नाशिक । नाशकात मंगळवारी सकाळी तब्बल ३६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातून २७ एप्रिलपर्यंत १ हजार ४४९ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यातील दिवसागणिक ७५९ निगेटिव्ह चाचणी अहवाल आले. कालपर्यंत ५५६ नमुने प्रयोगशाळेत प्रलंबित होते. त्यातील ३६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज (दि. २८) सकाळी प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये २२ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यात दोन डॉक्टरांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिणामी, एकूण बाधितांची संख्या १६२ झाली आहे. यापैकी पैकी सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.