पिंपरी विधानसभेचे आमदार श्री अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश : केसरी शिधापत्रिका धारकांना रेशनिंग मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने *केशरी रेशनकार्ड धारकांना स्वस्त दरात धान्य मिळावे वाटप करण्यात यावे ह्या साठी पिंपरी विधानसभेचे आमदार ह्यांनी राज्य सरकारकडे जो पाठ पुरावा केला होता त्याला यश आले आता मे व जून या दोन महिन्यात प्रती व्यक्ती ८ रूपये किलो दराने 3 किलो गहू व १२ रूपये किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळाचे येणार आहे*(सध्या फक्त मे महिन्याचे व नंतर जून महिन्याचे) आपल्या *प्रभाग क्र. १५ च्या परिसरातील फक्त केशरी रेशनकार्ड धारकांच्या सोयीसाठी  (सदरचे कार्ड कोणत्याही रेशन दुकानाशी सलग्न असले आणि अद्याप धान्य मिळालेले नाही त्यांच्यासाठी)

*ग्राहकांसाठी नम्र सुचना*
१) कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून गर्दी टाळून सोशल डिस्टंशींगचे पालन करावे. फेसमास्क लावून यावे.
२) धान्य घ्यायला येताना सोबत लहान मुलांना अथवा जेष्ठ नागरीकांना घेऊन येऊ नये अथवा पाठवू नये. एकाच व्यक्तीने यावे.
३) *एकाच व्यक्तीने आपले स्वतःचे रेशनकार्ड व आधारकार्ड बरोबर आणावे* तसेच गहू आणि तांदूळसाठी दोन कापडी पिशव्या व मालाच्या किमती एवढे सुट्टे पैसे घेऊन येणे.
४) कार्डामध्ये नोंद असलेल्या व्यक्तींच्या संख्येएवढेच धान्य मिळेल. शासनाकडून सध्या फक्त मे व जून महिन्याचेच गहू व तांदूळ उपलब्ध झाले असल्यामुळे इतर वस्तू अथवा इतर धान्याची मागणी करू नये.
५) एका व्यक्तीला एकाच तेसुद्धा स्वतःच्याच कार्डाचे धान्य मिळेल, कृपया इतरांचे कार्ड घेऊन येऊ नये.

सध्या फक्त मे महिन्याच्या धान्याचे वाटप होईल.* जून महिन्याचे धान्य वाटप नंतर होईल. एका वेळी एकाच महिन्याचे धान्य मिळेल. सर्व कार्डधारकांनी शिस्तीचे पालन करावे. अधिक माहितीसाठी *मे. एस.आर. आगरवाल* *प्लॉट क्र. जे/१०, सेक्टर क्र.२५, गायत्री हॉटेलमागे, प्राधिकरण* या दुकानातून दि. २८ एप्रिल २०२० पासून दररोज सकाळी १० ते दुपारी २.०० पर्यंत लोकांना वरीलप्रमाणे धान्य वाटप करण्यात येणार आहे.
श्री सुभाष अग्रवाल 7517029382, श्री निलेश शिंदे 9822275557, श्री बाळासाहेब ठाणगे 8999502300. – दुकानाचा पत्ता- *मे. एस.आर. आगरवाल**प्लॉट क्र. जे/१०, सेक्टर क्र.२५, गायत्री हॉटेलमागे, प्राधिकरण, निगडी*(अमित आंग्रे 9970998959)

कृपया आपणास विनंती आहे की, आपल्या परिसरातील गरजू नागरीकांना याचा लाभ मिळण्यासाठी ही बातमी  आपण जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करून सहकार्य करावे हि विनंती.

*आरोग्याचे नियम पाळा, कोरोनाचा संसर्ग टाळा !*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *