महाराष्ट्र 24 । बीड। विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके। कोरोना संदर्भात हयगय केल्यास होणार गुन्हा दाखल परळी लॉकडाऊनच्या कार्यकाळात बाहेरचा व्यक्ती गावात आला तर त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी, अशा सक्तीच्या सूचना सरपंचांना देण्यात आल्या आहेत. तरीही परळी तालुक्यातील कवडगाव हुडा (गव्हाणे) येथील सरपंचाने एका व्यक्तीची माहिती लपवल्याने सदरील सरपंचास सिरसाळा पोलिसांनी तुमच्या विरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये याबाबतची नोटीस बजावली आहे.
गावामध्ये बाहेर जिल्ह्यातील व्यक्तींना येऊ द्यायचे नाही, कोणी आलं तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यायची, याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सरपंचांना दिल्या. त्यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले. परळी तालुक्यातील कवडगाव हुडा येथे पुणे येथील एक व्यक्ती गावात आला. त्या व्यक्तीची माहिती प्रशासनाला कळविण्यात आली नाही. सदरील व्यक्तीत लक्षणे आढळून आल्याने त्यास उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यामध्ये गावचे सरपंच सुभाष रंगनाथ राठोड यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा केला त्यामुळे सिरसाळा पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. तुमच्यावर गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे.