कोरोना व्हायरस ; ESI हॉस्पिटल , मोहननगर ,चिंचवड हे रुग्णालय ‘कोविड रुग्णालय’ म्हणून पिं. – चिं. मनपाकडे तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध कर्मचाऱ्यांचेसह हस्तांतरित करावे – आमदार आण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । पिंपरी चिंचवड । विशेष प्रतिनिधी। लक्ष्मण रोकडे । ‘COVID – 19’ अर्थात कोरोना विषाणूंच्या प्रधुर्भावामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १०७ झाली असून भविष्यकाळात निर्माण होणारा धोका किंवा वाढणारी रुग्ण संख्या विचारात घेऊन अधिकच्या खाटांची व्यवस्था असणे आवश्यक वाटते. भविष्य कालीन तरतूद म्हणून राज्य कामगार विमा योजना रुग्णालय हे प्रशस्थ व सर्व सोयींनी परिपूर्ण असून रुग्नालायची क्षमता १०० बेड असून २१ डॉक्टर, ४९ स्टाफ नर्सेस, ५८ वॉर्डबॉय व स्वीपर्स असा कर्मचारीवर्ग उपलब्ध आहे.

सध्या शहर परिसरातील उदोग बंद असल्याने या रुग्णालयात आजची अंतररुग्ण संख्या केवळ 6 आहे. स्वतंत्र इमारत व सुरक्षित व्यवस्था या ठिकाणी असल्याने हे रुग्णालय मनपाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी तात्पुरते ताबत्या घेऊन त्या ठिकाणचे उपलब्ध मनुष्यबळ वापरून कोरोना रुग्णावर उपचार करावेत, यासाठी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मोरवाडी, चिंचवड हे रुग्णालय ‘कोविड रुग्णालय’ म्हणून पिंपरी चिंचवड मनपाकडे तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध कर्मचाऱ्यांचेसह हस्तांतरित करण्याबाबत आमदार बनसोडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे मागणी केली आहे. हे रुग्णालयात मोठा कर्मचारी वर्ग असून उपलब्ध साधनसामग्रीचा चांगला उपयोग होणार असून शहराची आरोग्य सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे. आमदार बनसोडे यांनी केलेली मागणी अर्थात कोरोना रुग्णावर उपचारासाठी सुचविलेला पर्याय उत्तम आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *