महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- पुणे- अँटी कोरोना टास्क फोर्स, महाराष्ट्रच्या कार्याचा आणि सर्व ACTF सहभागी कार्यकर्त्यांचे *मराठी अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार व गीतकार* यांनी गौरव, कौतुक, करतानाच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांनी तर *गीत गायनातून ACTF च्या कार्याचे वर्णन व शुभेच्छा* दिल्या आहेत.
अँटी कोरोना टास्क फोर्स च्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी आणि देशातील लॉक डाऊन च्या काळात गोरगरीब, सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच आरोग्य विषयक मदत कार्य इ. कामाबाबत *मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे, कमलेश सावंत, अशोक समर्थ, अभिनेत्री आदिती सारंगधर, प्राजक्ता शिंदे, नम्रता गायकवाड, हर्षा गुप्ते तसेच गायक व संगीतकार त्यागराज खाडिलकर, गीतकार संगीतकार संजय वारंग* यांनी गौरवोद्गार काढले.
अँटी कोरोना टास्क फोर्स च्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन गोरगरीब जनतेसाठी आजवरच्या केलेल्या आणि करत असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच यापुढील कार्यास शुभेच्छा देतानाच या कार्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, सर्व नागरिकांनी ACTF च्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असेही आवाहन *व्हिडिओ क्लिप* द्वारे केले.
*डॉ. भारती चव्हाण,*
*अँटी कोरोना टास्क फोर्स,*
*महाराष्ट्र राज्य आणि गोवा.*