करुणा शर्मांच्या अडचणीत वाढ ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- काय आहे प्रकरण?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शर्मा यांच्या विरोधात (Karuna Sharma) संगमनेर पोलीस ठाण्यात (Sangamner Police Thane) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारदाराविरोधात करुणा शर्मांच्या वतीनं आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांच्याविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा पक्ष काढण्यासाठी फिर्यादीकडून लाखो रुपये करुणा शर्मा यांनी घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 22 लाख 45 हजार रोख आणि 12 लाखांचे सोने घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. उसनवारी म्हणून दिलेली रक्कम आणि सोने परत मागितल्याने जीवे मारण्याची धमकी करुणा शर्मा यांनी दिली असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. संगमनेर तालुक्यातील कोंची येथील फिर्यादी भारत भोसले यांनी हे आरोप केले आहेत. 7 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यवहार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

करुणा शर्मा यांची (Karuna Sharma) यांनीही संगमनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमधील तिघांनी त्यांना एका कन्स्ट्रक्शन कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा होईल, असे सांगत त्यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले. याचा कुठलाही परतावा न दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर करुणा शर्मा यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *