दादा हा ‘शो’ नाही ; पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… ; श्रीकांत शिंदेंनी अजित दादांना करू दिली आठवण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ सप्टेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे (Dr Shrikant Eknath Shinde) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार ( ajit pawar) यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगली आहे. अजितदादांनी एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या स्टाईलमध्ये पहिल्यांदाच पलटवार केला आहे.

अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले होते. त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्वीट करून अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा हा ‘शो’ले आहे , एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा आहे आणि हो…हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली ? पिक्चर अभी बाकी है’, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘गणपतीच्या दर्शनाला आम्हीही जातो. पण कधी कॅमेरमॅन घेऊन जात नाही. पण, आता असे कॅमेरे लावले जातात, बरोबर गाडी थांबते, बरोबर कुणी तरी उतरलो, मग एंट्री होते. कशाला या सगळ्या गोष्टी पाहिजे. तुमचं तुमच्याकडे ठेवा. गणेशभक्तांनी देखावे ठेवायचे असतात. आता काय तर शो करायची सवय लागली आहे. राज कपूर हे शोमॅन होते, तशी सवय काही लोकांना लागली आहे, अशा शब्दांत अजितदादांनी टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *