![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ सप्टेंबर । जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या घसरणीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारातील किरकोळ किमतींवरही दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरातही बदल करण्यात आला आहे.
मात्र, दिल्ली-मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण, बिहारची राजधानी पाटणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लक्षणीय घट झाली आहे. आज सकाळी पेट्रोल ५६ पैशांनी १०७.२४ रुपये आणि डिझेल ५२ पैशांनी स्वस्त होऊन ९४.०४ रुपये प्रति लिटर झाले आहे. गेल्या२४ तासात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल २ डॉलरने घसरून ९४.५४ डॉलरवर आली आहे आणि WTI ०.७० डॉलरने घसरून ८८.२२ प्रति बॅरल झाली आहे.
या शहरातील आज पेट्रोल आणि डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
– कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
