महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ सप्टेंबर । आशिया चषकात टीम इंडियाचा (Team India) पहिला पराभव झाला. टूर्नामेंटच्या सुपर-4 च्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. याआधी ग्रुप फेरीत भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना भारताने 7 बाद 181 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 60 धावा केल्या.
यानंतर पाकिस्तानने (Pakistan) 19.5 षटकांत 5 गडी राखून सामना जिंकला. मोहम्मद रिझवानने 71 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद नवाजनेही 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुपर-4 च्या 4 पैकी फक्त 2 संघ अंतिम फेरीत जाऊ शकणार आहेत. सुपर-4 मध्ये प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता या पराभवानंतर टीम इंडियाचे अंतिम फेरी गाठण्याचे समीकरण कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.
टीम इंडियाचा (Team India) दुसरा सामना 6 सप्टेंबरला श्रीलंकेशी तर 8 सप्टेंबरला शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. जर संघाने दोन्ही सामने जिंकले तर ते अंतिम फेरीच्या शर्यतीत राहतील. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. जर श्रीलंका टीम इंडियाकडून हरला आणि पाकिस्तानकडून जिंकला तर त्यांचेही 4-4 गुण होतील. दरम्यान, पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव केल्यास तिन्ही संघांचे 4-4 गुण होतील. रनरेटच्या आधारे टॉप-2 ठरवले जाईल.
पाकिस्तानने (Pakistan) आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकले त्याचा फयदा टी इंडियाला होणार आहे. तरच टीम इंडियाचा दोन्ही सामने जिंकून जेतेपदाच्या फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल. टीम इंडियाचे 4 गुण असतील तर श्रीलंकेचे 2 आणि अफगाणिस्तानचे शून्य गुण असतील. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. त्याने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे श्रीलंकेने 5 तर पाकिस्तानने 2 वेळा विजय मिळवला आहे.
पाकिस्तान संघाने त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तानला पराभूत केले तर ते अंतिम फेरीत पोहोचतील. तर दुसरीकडे, भारतीय संघ श्रीलंके विरुद्ध जिंकला आणि अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर तिन्ही संघांचे २-२ गुण होतील.