![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ सप्टेंबर । भारतीय सराफा बाजारात सोमवारचे सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे.24 कॅरेट शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने आज 50784 रुपयांवर आहे. तर एक किलो चांदीची आज 53082 रुपयांना विक्री होत आहे.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50784 रुपये प्रति दहा ग्रॅम असा खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोन्याचा दर 50584 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे.
मात्र यानंतरही, सोने आजही 5,416 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.
चांदीच्या दरातही वाढ
आज चांदीचा दर 53082 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 52472 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर किलोमागे 610 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे.