![]()
महाराष्ट्र 24 : विशेष प्रतिनिधी : सलमान मुल्ला: दि. 5 सप्टेंबर : कळंब:- दिनांक 5 सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो याच अनुषंगाने श्री.शिव छत्रपती वाचनालय कन्हेरवाडी ता. कळंब या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीराव जगताप हे अनेक वर्षांपासून शिक्षक दिन हा कार्यक्रम घेतला जात आहे..
या वर्षीपन विद्याविकास हायस्कूल कन्हेरवाडी आणी जि.प.प्रा.शाळेतील शिक्षक,शिक्षीका व गावातील सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला आहे
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री निवृत्ती जगताप सरपंच ॲड.रामराजे जाधव, अशोक कवडे, सेवा निवृत्त शिक्षक संपत जाधव, वसंतराव कवडे,प्रा.संजय नाना मिटकरी,विक्रम कवडे , महेश मिटकरी ग्रंथालय कर्मचारी , दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षीका आणि विद्यार्थी व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते..
यावेळी संस्थापक अध्यक्ष निवृतीराव जगताप, सरपंच रामराजे जाधव , संजय नाना मिटकरी यांनी मार्गदर्शन केले.