सत्तासंघर्षाची लढाई पुढे ढकलली : 27 सप्टेंबरला पुढील सुनावणी शिंदेंच्या वकिलांची हि मोठी मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ सप्टेंबर । महाराष्ट्रातील राजकीय संकटात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षातील बंडखोर गट शिंदेसेनेकडून दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी CJI ला सांगितले की, हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे, त्यामुळे निवडणूक आयोग वास्तविक शिवसेनेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. CJI यू यू ललित म्हणाले की, बुधवारी खंडपीठ बसेल, त्यानंतर बघू.

एकनाथ शिंदेंचे वकील कौल यांचा कोर्टात युक्तीवाद- निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवा, तसेच घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.

तीन महिन्यांच्या सुनावणीनंतर 25 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले. 20 जून रोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 20 आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले होते तेव्हा शिवसेनेतील वाद सुरू झाला होता. यानंतर शिंदे गटाने शिवसेनेच्या 55 पैकी 39 आमदारांसोबत असल्याचा दावा केला, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.

गेल्या सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आमच्यावर चुकीच्या पद्धतीने अपात्रतेचा आरोप लावण्यात आला आहे. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात, वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना सांगितले होते की, शिंदे गटात सामील होणारे आमदारांनी जर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच ते घटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेपासून वाचू शकतात. अन्यथा अपात्रतेपासून वाचण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असे ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *