‘तो’ तरुण अमित शहांच्या जवळ का पोहोचला? , पोलिस तपासात धक्कादायक माहितीसमोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये सुरक्षेत मोठी चुकू झाल्याचे समोर आले आहे. अमित शहा यांच्याजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वतःची राजकीय व्यक्तींशी जवळीकता असल्याचे भासवून त्यामार्फत आर्थिक लाभ मिळवण्याकरीता त्याने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. एकदिवशी दौऱ्यामध्ये त्यांनी लालबागचा राजा आणि भाजप नेत्यांची बैठक घेतली होती. पण, या दौऱ्यादरम्यान, एक व्यक्ती शहा यांच्या जवळपास पोहोचली होती. बऱ्याच वेळ ही व्यक्ती भटकत होती. हेमंत पवार असं या तरुणाचे नाव आहे. हा तरुण धुळ्यात राहणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेमंत पवार याने आधी आपण आंधप्रदेश सरकारमधील खासदाराचा सचिव असल्याचे सांगून अमित शहा यांच्याजवळपास फिरत होता. त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असता तो धुळ्याचे असल्याचे उघड झाले.

विशेष म्हणजे, हेमंतने पोलीस आणि शहा यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याचा सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवले होते. त्यानुसार गळयामध्ये गृह मंत्रालय/ मिनिस्ट्री ऑफ होमअफेअर्स असे नामनिर्देष असलेली निळया रंगाची आयकार्डसोबत असणारी रिबीन लावून शासकीय अधिकारी असल्याची बतावणी केली. या बनावट आयकार्डच्या मदतीने हेमंतने अमित शहा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर असताना तेथील कार्यक्रमात जाण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी हेमंतवर मलबार हिल पोलीस ठाण्यात कलम 170,171 भादंवि अंतर्गग गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. स्वतःची राजकीय व्यक्तींशी जवळीकता असल्याचे भासवून त्यामार्फत आर्थिक लाभ मिळवण्याकरीता त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *