श्रीगणेश विसर्जनाचे आज 4 मुहूर्त:जाणून घ्या, विसर्जनाची सोपी पद्धत आणि मंत्र,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । आज अनंत चतुर्दशी आहे. 10 दिवस गणेशाची पूजा केल्यानंतर आज श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. ग्रंथात गणेशमूर्ती विसर्जनाचा उल्लेख नाही परंतु परंपरेमुळे विसर्जन प्रथा सुरु आहे. वेदव्यास आणि श्रीगणेशाच्या महाभारत लिहिण्याच्या कथेपासून ही परंपरा सुरू झाली आहे. ज्यामध्ये महाभारत लिहिताना श्रीगणेशाच्या शरीरातील उष्णता वाढली होती, तेव्हा वेदव्यासांनी त्यांना स्नान घातले. तेव्हापासून गणपतीची स्थापना केल्यानंतर विसर्जन करावे, अशी मान्यता आहे.

आज गणपती विसर्जनाचे चार मुहूर्त आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या वेळेला गणपतीचे विसर्जन करू शकता. परंतु हे काम सूर्यास्तापूर्वी करावे हे लक्षात ठेवा. शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.

गणेश विसर्जनाचे मुहूर्त
सकाळी ६ ते १०. ३०
सकाळी ११.५० ते दुपारी १२. ४०
दुपारी १. ०० ते १. ५०
संध्याकाळी ५ ते ६. ३०

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *