LPG च्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले ; सिलिंडर स्वस्त होणार का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीबाबत दिलासा मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना तयार केली आहे. तेल कंपन्या गॅस सिलिंडर आणि पेट्रोलचे नुकसान करत नसल्याची माहिती अलीकडेच एका अहवालातून समोर आली आहे. आता महागाईचा दर सात टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचवेळी सिलिंडर स्वस्त होण्याचे संकेत आहेत.

सलग तीन महिने किरकोळ महागाई दरात घट झाल्यानंतर देशात किरकोळ महागाई दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये 6.71 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. तेल कंपन्या गॅस सिलिंडर (Cooking Gas Price) आणि पेट्रोलचे नुकसान करत नसल्याची माहिती अलीकडेच एका अहवालातून समोर आली आहे. आता डिझेलच्या विक्रीत त्यांचे नुकसान होत आहे.

तेल कंपन्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी आणि देशवासीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी, सरकार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) सारख्या सरकारी इंधन किरकोळ विक्रेत्यांना 20,000 कोटी रुपये देण्याचा विचार करत आहे . यासह इंधन विक्रेत्यांचे होणारे नुकसान भरुन काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात. सध्या LPG सिलिंडर 1053 रुपयांच्या उच्चांकावर आहे.

दरम्यान, घरगुती गॅससोबतच पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याबाबत माहिती देताना या विषयातील जाणकारांनी सांगितले की, सरकारी तेल कंपन्यांना आंतरराष्ट्रीय किमतीवर क्रूड खरेदी करावे लागते आणि किंमत संवेदनशील बाजारात विकावे लागते. दुसरीकडे, खासगी कंपन्यांकडे मजबूत इंधन निर्यात बाजार टॅप करण्याची लवचिकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *