महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- पुणे – विशेष प्रतिनिधी- कोरोना व्हायरसच सावट आहे. कोरोनाच्या दहशती खाली नागरिक सतत जगत आहे.त्यामुळे कोरोनाच्या दहशतीत लोकांचं मनोबल वाढविण्यासाठी आज कथक कलाकारांनी आंतरराष्ट्रीय नृत्यदिन साजरा केला आहे. या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचया निमित्ताने पुण्यातील कथक नृत्यिका मनिषा अभय, सिद्धी अभय आणि इतर सहकलाकारानी मिळून भैरवी या गाण प्रकारातून नृत्य सादर केलाय. भैरवी ही कार्यक्रमाच्या अंती गायली जाते. Covid -19 चाही अंत जवळ आला आहे, याच विश्वासाने या कथक कलाकारांनी एकत्र मिळून भैरवी मांडली आहे. आपण सर्व कलाकार मंडळी या परिस्थितीत आनंदी, उत्साही राहतोय त्याचं श्रेय आपल्या कलेला आहे. या कलेची अखंड, निरंतर सेवा व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून कथक कलाकारांनी भैरवी या गाणं प्रकारावर आधारित नृत्य सादर केलं आहे.