महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील १ लाख नोकऱ्या बुडाल्या असा आरोप विरोधकांकडून करत सत्ताधाऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी गुजरातला प्राधान्य का देण्यात आला याचा खुलासा केला आहे. (Why preference for Gujarat Vedanta Foxconn Project Anil Agarwal Owner Of Vedanta)
https://twitter.com/AnilAgarwal_Ved/status/1570096525883355138?s=20&t=aH5yhBXZYKrXkgX56rE1RQ
काय म्हणाले आहेत अनिल अग्रवाल?
कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी ‘वेदांत-फॉक्सकॉन’कडून प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने वेगवगेळ्या जगांची पहाणी सुरु होती. ही वैज्ञानिक आणि आर्थिक घटकांशी संबंधित कार्यपद्धती असून त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. आम्ही ही प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी सुरु केली होती.
अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम बुधवारी भारतीय बाजारावरही दिसून आला. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी 1000 हून अधिक अंकांनी घसरताना दिसले. मंगळवारी अमेरिकेचे तिन्ही महत्त्वाचे निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिक घसरले होते. अमेरिकेतील महागाई दर कमी झाल्यामुळे बाजारावर दबाव होता .
आमच्या कंपनी अंतर्गत तसेच इतर संस्थांच्या मदतीने केलेल्या पहाणीनंतर काही राज्यांची नावं पर्याय म्हणून निश्चित करण्यात आली. त्यामध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूचा समावेस होता. आमचं उद्देश साध्य करण्यासाठी ही राज्यं योग्य असतील असा निष्कर्ष निघाला.
मागील दोन वर्षांपासून आम्ही या राज्यांमधील सरकारांबरोबरच केंद्र सरकारच्या संपर्कात असून आम्हाला त्यांनी उत्तम पाठिंबा दिला आहे. असे सांगत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गुजरातची निवड का करण्यात आली याबद्दलचा खुलासा केला आहे.
गुजरातला प्राधान्य का?
“काही महिन्यांपूर्वी आम्ही गुजरातचं नाव निश्चित केलं. त्यांनी आम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी देऊ केल्याने ही निवड करण्यात आली. मात्र जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील नेतृत्वासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला या स्पर्धात्मक निवडीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मोठी ऑफर दिली. आम्हाला एका जागेवरुन सुरुवात करायची होती. त्यामुळेच आम्ही तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार गुजरातची निवड केली,” असा खुलासा अनिल अग्रवाल यांनी तिसऱ्या ट्वीटमध्ये केला आहे.
शेवटच्या ट्वीटमध्ये लवकरच महाराष्ट्रातही गुंतवणूक करणार असल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे. आम्ही महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्यास कटीबद्ध आहोत. गुजरातपासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये देशभरात विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. असे त्यांनी चौथ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.