Mahableshwar : महाबळेश्वरला जाणारी वाहतुक धिम्या गतीनं; अवजड वाहनांना घाटात प्रवेश बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ सप्टेंबर । Mahableshwar Road Closed For Heavy Vehicles : सातारा महाबळेश्वर (mahableshwar) रस्त्यावरील केळघर घाटात दरड कोसळली आहे. यामुळे या घाटातील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे. या घाटातून अवजन वाहनांसाठी असलेली वाहतुक पुर्णत: बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

सातारा शहर व परिसरात आज पहाटेपासून पावसानं (rain) हजेरी लावली आहे. सततच्या पडणा-या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा हाेत आहे. नागरिकांना देखील चालताना अडचण येत आहे.

दरम्यान आज पहाटेच्या सुमारास केळघर घाटात दरड काेसळली. ही दर कोसळल्याने मेढ्याकडून महाबळेश्वरला जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. सध्या या भागातून अवजड वाहनांसाठीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *