बाबा रामदेव 5 नवे IPO बाजारात आणण्याची तयारीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । पतंजली फूडसचा आयपीओ बाजारात आणल्यानंतर बाबा रामदेव यांनी त्यांच्या 5 कंपन्यांचे IPO बाजारात आणण्याचे ठरवले आहे. याबाबत घोषणा करण्यासाठी बाबा रामदेव हे आज एक पत्रकार परिषद घेणार आहेत. बाबा रामदेव हे पतंजलीच्या अन्य उत्पादनांचे आयपीओ बाजारात आणण्याचा विचार करत असून यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस पतंजली मेडिसीन, पतंजली लाईफस्टाईल या कंपन्यांचा समावेश आहे. येत्या 5 वर्षात या कंपन्यांचे आयपीओ आणण्याची बाबा रामदेव यांनी तयारी सुरू केली आहे.

बाबा रामदेव यांची पतंजली फूडस ही एकमेव कंपनी सध्याच्या घडीला बाजारात लिस्टेड आहे. पतंजली आयुर्वेदने 2019 साली रुचि सोया ही कंपनी 4350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. ही कंपनी आधीपासून शेअर बाजारात लिस्टेड होती. या कंपनीचे नाव बदलून पतंजली फूडस करण्यात आले होते. या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला असून या कंपनीचे शेअर हे यापुढेही वाढत जातील असे सांगितले जात आहे.

पतंजली फूडसच्या शेअरने 5 वर्षांत 5400% टक्के परतावा दिला आहे. गेल्या दीड महिन्यात या शेअरचे भाव 13 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांचा विचार केल्यास या शेअरच्या दरात 54 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेअरचा भाव 2 वर्षांत 105 टक्क्यांनी तर 5 वर्षांत 5400 टक्क्यांनी विधारला आहे. 2017 साली या शेअरची किंमत 26 रुपये होती जी गुरुवारी म्हणजेच 15 सप्टेंबर 2022 रोजी शेअर बाजाराचे कामकाज संपताना 1345 झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *