Pune : ‘सेक्स तंत्रा’ला विरोध; अखेर पुण्यातलं ‘ते’ शिबीर रद्द

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ सप्टेंबर । पुण्यात नवरात्रीच्या काळात आयोजित करण्यात आलेलं सेक्स तंत्र शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिराला अनेकांनी विरोध केल्यानंतर आता अखेर हे शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होतं.

या सेक्स तंत्र शिबिराची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यानंतर या शिबिराला जोरदार विरोध होत होता. १ ते ३ ऑक्टोबर या काळात पुण्यात हे शिबिर होणार होतं. यासाठी १५ हजार रुपये फीही आकारण्यात येणार होती. मात्र आता विरोध लक्षात घेऊन आयोजकांनी हे शिबिर रद्द केलं आहे.

या शिबिराला होणाऱ्या विरोधानंतर उत्तर प्रदेशातले आयोजक रवि सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. उत्तर प्रदेशातल्या सत्यम शिवम सुंदरम या संस्थेमार्फत हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होतं. मात्र विविध राजकीय पक्षांनी याला केलेल्या विरोधामुळे हे शिबिर रद्द करण्यात आलं. मात्र तरीही पोलीस या शिबिराच्या आयोजकांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *