……… यांनीच ठाकरे सरकार पाडण्याचा विडा उचलला होता: प्रकाश आंबेडकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ सप्टेंबर । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा उचलला होता, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही, असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले. ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्यासाठी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले.

काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दुसऱ्या गटात सामील झाले होते. यापैकी सर्व आमदारांचा रोष हा मुख्यत्त्वेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थमंत्री असल्याने निधीवाटपात आमच्यासोबत दुजाभाव होतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी केला होता. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय भूमिका मांडणार, ते पाहावे लागेल.

प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारसह राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशाची राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. नेहरुंनी कबुतर सोडली होती. मोदींनी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं आंबेडकर म्हणाले. दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडून सरकारी संपत्ती विकण्यावरून ज्या पद्धतीची टिप्पणी करण्यात आली, ती पाहता आपण दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका करताना सांगितलं होतं, की एखाद्या दारुड्याला दारुसाठी पैसे मिळाले नाही की, तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो, तशाच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दारुड्याप्रमाणे वर्तन असल्याचे सांगितले होते. याला आता रिझर्व बँकेकडून दोन महिन्यांपूर्वी पुष्टी देण्यात आलेली आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींवर आंबेडकरांनी निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *