कळंब:-जनकल्याण अर्बन बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला । दि .२१ सप्टेंबर । कळंब:-येथील जनकल्याण अर्बन बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त कळंब येथील साई मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.बँकेचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन उमेश (दादा) कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता..

उद्योग, व्यवसायात पाऊल टाकून ‘आत्मनिर्भर’ होऊ पाहणाऱ्या तरुणांच्या प्रयत्नाला बळ देण्याचा प्रयत्न करत जनकल्याण बँकेने एकप्रकारे तालुक्याच्या विकासाला हातभार लावत ‘जनकल्याण’ हे नाव सार्थकी लावले आहे.

कळंबच्या विकासासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याची गरज आहे. या अनुषंगाने आपण कळंब येथे १०० एकरात एम.आय.डी.सी. उभी करण्याच्या प्रयत्नात आहोत. यात सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे.असे यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले..

तसेच बँकेचे चेअरमन श्री.उमेश कुलकर्णी व त्यांच्या सर्व संचालक मंडळाचे उस्मानाबाद तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आमंत्रित केल्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते ॲड.मिलींद पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, बँकेचे सभासद व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *