लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल; पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । विशेष प्रतिनिधी । मुंबई : कोरोनाचे संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना राज्य सरकारच्या नियमाना हरताळ फासण्यात येत आहे. कोरोनाचा धोका असताना लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. आतापर्यंत पोलिसांवर हल्ला केल्याच्या १६५ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८३,१५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १६,८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *