लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल महिन्याचे विजेचे बिल भरण्यास सरकारची मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । विशेष प्रतिनिधी । मुंबई : मार्च महिन्याचे विजेचे बिल १५ मेपर्यंत, तर एप्रिल महिन्याचे बिल ३१ मेपर्यंत भरण्याची सवलत सरकारकडून देण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रीडिंग घेण्यात येणार नसून मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज बिल तयार करण्यात येणार आहे.

ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मीटर रीडिंग, वीज बिल वितरित करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहीम, वीजपुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारने अशा लोकांनादेखील दिलासा दिला आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक महत्त्वाचे पावले उचलली जात आहेत. लोकांना घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून सतत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *