महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । विशेष प्रतिनिधी । गणेश भड । बुलढाणा : महाराष्ट्र राज्य स्थापनेला १ मे २०२० रोजी ६० वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम साधेपणाने आयोजित करण्याच्या सूचना केलेली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय वगळता अन्य कार्यालयांमध्ये ध्वाजरोहण समारंभ घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता ध्वजारोहण होणार आहे तसेच यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये, कवायतीचे आयोजन करण्यात येऊ नये, अशा शासनाने सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२० रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र इतर शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपरोक्त मान्यवर वगळता कुणीही या कार्यक्रमास उपस्थित राहू नये, असे उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी कळविले आहे.