PPE किट खरेदीसाठी YCM व जिल्हा रुग्णालयास आमदार आण्णा बनसोडे यांनी दिले ५० लाख

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – पिंपरी- विशेष प्रतिनिधी-अण्णा बनसोडे  यांनी ५० लाख रुपयांचा निधी शहरातील यशवंतराव चव्हाण स्मुती रुग्णालय (YCM HOSPITAL) व जिल्हा रुग्णालय, औंध, पुणे येथे कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी PPE उपलब्द करून देण्यासाठी त्यांच्या आमदार निधीमधून दिला असून या कोरोना युद्धातील सैनिक सुरक्षित राहावेत अशी आशा व्यक्त केली. ‘COVID – 19’ अर्थात कोरोना विषाणूंच्या प्रधुर्भावामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील परिस्थितीचा आढावा आमदार बनसोडे यांनी मनपा मुख्यालयातील वॉररूमला भेट देऊन घेतला. शहरातील कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशी सूचना मनपा आयुक्तांना दिली. कोणत्याही परिस्थितीत शहरात कोरोना रुग्ण वाढू नयेत म्हणून आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, तसेच या महामारीच्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता आहोरात्र झटणाऱ्या कर्मचारी वर्गास निर्माण होणाऱ्या अडचणीबाबतही आयुक्तांसमवेत चर्चा केली असल्याची माहिती आमदार बनसोडे यांनी दिली. या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक डब्बू आसवांनी, नगरसेवक अमित गावडे, उपस्थित होते.


कोरोना वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे योगदान आपल्या विसरून चालणार नाही. अशा सर्व ज्ञात अज्ञात कोरोना योद्ध्यांचे आभारी आहोत व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन आमदार बनसोडे यांनी केले आहे. पोलीसदल, स्वच्छता कर्मचारी, मनपा अधिकारी कर्मचारी व सर्व कोरोना योद्धे या संकटावर मात करण्यासाठी झटत आहेत. परंतु कोरोना फैलाव सध्या धोकादायक पातळीवर असून नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्यावी आणि अति महत्वाच्या कारणा शिवाय घराबाहेर पडू नका. नागरिकांनी (सामाजिक अंतर) सोशल डिस्टसिंग पाळून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी व गर्दी न करता सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी व सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आमदार बनसोडे प्रसिद्धीस देलेल्या पत्रकाच्या माध्यमातून शहरातील तमाम नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *