महाराष्ट्र २४ ऑनलाईन – बुलडाणा- विशेष प्रतिनिधी – गणेश भड – कोविड19 च्या अनुषंगाने बुलडाणा जिल्हा मुख्यालयी असलेल्या 100 खाटांच्या महिला रूग्णालयाला विशेष दर्जा मिळालेला असून ते कोविड रूग्णालय म्हणून घोषित झालेले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संशयित रूग्णांचे संस्थात्मक विलगीकरण व करोना पॉझिटीव्ह रूग्णांना उपचारासाठी याच रूग्णालयाचा वापर होत आहे, मात्र अद्यावत वैद्यकीय सुविधा नव्हत्या. तसेच मूलभूत सुविधांचा देखील अभाव असल्याने मोठी ओरड गत काही दिवसांपासून होत होती आणी वेळोवेळी प्रशासनांचे वाभाडे निघत होते.
तथापि या ठिकाणी अनेक सुविधा उपलब्घ नसल्याने रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या अनेक बाबी सुध्दा सामोरे आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर हे रूग्णालय सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज व अद्यावत असावे यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांकडे सुध्दा पाठपुरावा सुरू होता ज्यात मातृभूमी फाऊंडेशन
च्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसेवकाच्या साठीची अग्रणी संस्था असलेली टाटा ट्रस्ट कडून अपेक्षा व्यक्त केली असता या प्रयत्नांना यश आलेले आहे.
त्याअंतर्गत या रूग्णालयाच्या अनुषंगिक स्थापत्य कामे, विद्युतीकरण, Extra low voltage system (ELV), Heating, Ventilation and air conditioning (HVAC), Public health engineering system (PHE), अग्निशमन यंत्रणा (Fire fighting system) , अंतर्गत रचना कार्य ( Interior) इत्यादी विविध कामे टाटा ट्रस्टकडून केल्या जाणार असून तब्बल सव्वा दोन कोटी रूपये खर्च केल्या जाणार आहेत.