महाराष्ट्र २४ ऑनलाईन – परळी – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – परळी औ.वि.केंद्रा मार्फत सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व कर्मचारी अधिकारी यांनी माहे एप्रिल महिन्यात स्व:इच्छेने मदत म्हणून कोरोनाग्रस्ताच्या मदतीकरिता *“मुख्यमंत्री सहायत्ता निधी कोविड-१९” ३,८५,५००/-रु* (तीन लक्ष पंच्यांशी हजार पाचशे रु) चा धनादेश मा.डॉ.विपिन पाटील साहेब तहसीलदार परळी वै. यांच्याकडे *परळी औ.वि.केंद्राचे मुख्य अभियंता मा.एन.एम.शिंदे साहेब*, उप-मुख्य अभियंता मा.के.एम.राऊत साहेब यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या वेळी सर्व संघटना प्रतिनिधी म्हणून श्री.अरुण गित्ते, वाहेदअली सय्यद, बप्पा वडमारे हे उपस्थित होते.
परळी औ.वि.केंद्रामार्फत स्वतंत्र कोरोनाग्रस्ताकरीता निधी जमा करण्याकरीता मुख्य अभियता मा.एन.एम.शिंदे साहेबांनी सर्व संघटना प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन मदत करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार एप्रिल महिन्यात परळी येथील कार्यरत कर्मचारी अधिकारी यांनी आवाहनास भरभरून प्रतिसाद देत ही रक्कम स्व:इच्छेने वेतनातून कपात करण्याची परवानगी दिली व हा निधी जमा करण्यात आला या सर्व प्रक्रियेत श्री. अविनाश जाधव
स.कल्याण अधिकारी(प्र) यांनी विशेष सहकार्य केले.