Gold-Silver Price : सोने-चांदीच्या दरात घसरण; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ सप्टेंबर । Gold- Silver Price Today : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,५०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,०१० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५६,८०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५८,००० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,७३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,५३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,७६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६८ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *