महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ सप्टेंबर । अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतील कोर्टाने नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कोर्टाने हे वॉरंट काढले असून शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्यावरून जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Navneet Rana News Today)
गेल्या महिनाभरात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ आहे. राणा ज्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतू राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. (Navneet Rana Latest News)
शाळा सोडल्याच्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, नवनीत राणा यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॉरंट बजावले आहे. दरम्यान, अटक वॉरंट निघताच नवनीत राणा यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.