महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सलमान मुल्ला । दि . २६ सप्टेंबर । कळंब । कोरोना कालखंडात प्राणांची तमा न बाळगता जागतिक आपत्ती व राष्ट्रावर ओढावलेल्या कोरोना या महाभयंकर साथरोगात सेवा दिलेल्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महामारी योद्धा संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व तालुके,जिल्हे आणि अगदी आझाद मैदान मुंबईतही अनेक वेळा,शासन सेवेत कायम करावे या मागणी करीता सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून मोर्चे काढत आंदोलने केली होती.यानंतर आज सत्तेत असणाऱ्या मंडळींनी तेंव्हा सदनामध्ये या मागणीस पाठींबा देत,तत्कालीन पाय उतार झालेल्या आघाडी सरकारला धारेवर धरले होते,त्यानंतर आरोग्य विभागात एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती निघाली,त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही प्राधान्य देण्यात आले नव्हते,परीक्षेतही मोठ्याप्रमाणावर घोटाळा झाल्याचे उघड झाले होते,त्यात बडे अधिकारी पोलिसांच्या गळाला लागले होते.
आता सत्तांतरानंतर राज्यात भाजपा-शिवसेना(शिंदे गट)या युतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत प्राधान्य देण्याबाबत नुकतीच घोषणा केली असताना, महामारी योद्धा संघर्ष समिती,महाराष्ट्र चे संस्थापकीय प्रमुख संतोष भांडे यांनी या घोषने बाबत सरकारचे आभार व्यक्त करत,महाराष्ट्रातील कोरोना योद्धे असमाधानी असल्याचे तथा त्यांना पुर्ण न्याय अद्याप मिळालेला नसल्याचे मत व्यक्त केले असून,आज येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तथा आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांना,कोरोना योद्धयांच्या मागण्या मान्य न झालेस,येत्या तीन आक्टोंबर रोजी कळंब शहरात कोरोना योद्ध्यांचा राज्यव्यापी मोर्चा व आंदोलन होणार असल्याचे निवेदन पाठवले असुन,निवेदनावर संस्थापिका प्रमुख संतोष भांडे, प्रदेशाध्यक्ष दिलीप लांडगे,कविता अबुज,अजित कसबे,मुक्ता भारती,रूपेश कांबळे,सविता जाधव,अंजना फाकले,कविता थांबणारे,राजूबाई धनवे,वैशाली ढवळे,सुप्रिया दराडे,श्रीदेवी वाघमारे,विद्याधर काटे आदी पदाधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या सह्या आहेत.