![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । हरियाणा, पंजाब, दिल्लीत ऑक्टोबरच्या सुरुवातीला मान्सून निरोप घेईल. याबरोबरच जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम यूपी या भागातूनही तो परतेल. वास्तविक २० सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. परंतु निरोप घेतलेल्या ठिकाणीच मान्सून सहा दिवस मुक्कामी होता. ३० सप्टेंबरपर्यंत पाऊसमान नोंदवले जाईल.
मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होते. हाच कमी दाबाचा पट्टा पुढे उत्तर, मध्य भारतातून पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचतो. यंदा आतापर्यंत अशा ११ प्रणाली तयार झाल्या होता. सप्टेंबरमध्ये दाेन सिस्टिम तयार झाल्या. १५ ते१८ पर्यंत तयार झालेल्या पहिल्या सिस्टिममुळे लखनऊसह पूर्व उत्तर प्रदेश तसेच दिल्लीपर्यंत मुसळधार पाऊस झाला. दुसरी सिस्टिम २१ सप्टेंबरला ओडिशाहून मार्गक्रमण करत २२-२३ सप्टेंबरला मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरच्या चक्रिवादळी प्रणालीच्या रूपात स्थिर झाली. पुढे ते उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणापर्यंत पोहोचले. त्यामुळे पाच दिवस हलक्या सरी तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सामान्यपणे अशी घटना जुलै-ऑगस्टमध्ये घडते. २७ सप्टेंबरपर्यंत ढग निवळतील.
सायक्लोनिकमध्ये सर्क्युलेशनमध्ये घड्याळीत उलट्या दिशेने वारे वाहू लागतात. वारे खालून वरच्या दिशेने वाहू लागतात. थंड होऊन तसेच सघन होऊन त्याचे ढगात रूपांतर होते. अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशनमध्ये वारे घड्याळीच्या दिशेने वाहू लागतात. त्यात वारे वरून खालच्या दिशेने येतात. ते वारे उष्ण असते. त्यातून ढग बनत नाहीत. उत्तर भारतापर्यंत पोहोचलेली ही सिस्टिम आता संपुष्टात येत आहे. परंतु नवीन अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन राजस्थानात तयार होत आहे. ते पुढे सरकल्यास पावसाची शक्यता कमी होईल.
मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीचा ट्रेंड तर दिसत आहे. तीस वर्षांपूर्वी रिमझिम पडणारा पाऊस आता गायब झाला आहे. तेव्हा रिमझिम आणि अनेक दिवस पावसाचा मुक्कामही होता. त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.
भारतात हवामानाचा पूर्वअंदाज बांधणे अमेरिका, युरोप एवढे सोपे नाही. भारताला दोन्ही बाजूंनी समुद्र आहे. उष्णता खूप जास्त आहे. हवेत आर्द्रतेचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पाऊस कधी कोसळेल, याचा अचूक अंदाज लावणे कठीण काम आहे. थंडीत मात्र आपण जास्त अचूक अंदाज सांगू शकतो. मान्सूनच्या बाबतीत मात्र दोन ते तीन दिवस आधी ८० टक्के अंदाज बांधता येतो.