महाराष्ट्र २४ ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – मुंबई, पुणेपाठोपाठ आता औरंगाबादेत कोरोनानं थैमान घातलं आहे. शहरातील काही परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. परिणामी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात दिवसभरात शहरात कोरोनाचे 47 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 177 वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शहरात गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडीत 18 रुग्ण, नूर कॉलनी 2, बीड बायपास 1, खडकेश्वर 1, रोहिदासनगर 4 रुग्ण, नारेगाव, अजीज कॉलनी प्रत्येकी 2, रोशन गेट 1, भीमनगर 2 तर किले अर्क परिसरातील 4 रुग्णांचा समावेश आहे.