धनुष्यबाण कोणाचे ?याचा निकाल आज तातडीने ……. ; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ सप्टेंबर । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार असून आज एक महत्त्वपूर्ण निर्णयही समोर येण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पाहता येणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE होणार आहे. 

धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागेल, याची शक्यता कमी असल्याचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या प्रकरणांची खिचडी झाली आहे. अनेक प्रकरणांचा संपूर्ण अंगानी घटनापीठासमोर विचार केला जाईल, त्यानंतर निकाल येऊ शकेल. निवडणूक आयोगाला पुढील कारवाई करण्यासाठी स्थगिती द्यावी की नाही, याचा विचार घटनापीठाला करावा लागणार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *