बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच पंकजा मुंडे नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडे यांनीच आपल्या संपूर्ण भाषणाच्या व्हिडीओची लिंक पोस्ट करत या वादावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले, तर हेही पहा, असं मत व्यक्त केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाच्या ‘हायलाईट्स’. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले, तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंकवर आहेच. धन्यवाद.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *