मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात देवीच्या दर्शनासाठी जाणार ठाकरे कुटुंबियांतील ‘ही’ व्यक्ती ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही महिन्यांपासून सत्तासंघर्ष सुरु असतानाच शिंदे (Shinde) आणि ठाकरे गटात (Thackeray group) सतत घडामोडी सुरु असतात. त्यात दसरा मेळाव्याचा (Dussehra gathering) वादावर अखेर तोडगा निघाला आहे. त्यातच आताची शिवसेना आणि शिंदे गटासाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियातील (Thackeray family) एक व्यक्ती शिंदेच्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे अशी माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या देवीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) बायको रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) जाणार, असल्याचं बोलं जातं आहे. ठाण्यातील (Thane) जय आंबे नवरात्रोत्सवाला (Jai Mango Navratri festival) रश्मी ठाकरे उद्या भेट देणार आहे. एकनाथ शिंदे यांची मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका (Thane Tembhi Naka) जय आंबे देवीची ओळख आहे. स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी टेंभी नाका जय आंबे देवीची स्थापना केली होती…(Navratri 2022 shivsena Rashmi Thackeray said to be visiting cm Eknath Shinde devi pandal nm)

दसरा मेळाव्याचा तोडगा सुटला!
तरदुसरीकडे दसरा मेळाव्याला अखेर मुंबई महानगरपालिकेकडून ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केलीय. तरीदेखील ठाकरे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटाने कंबर बांधली आहे. शिंदे गटाची आज वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) दुपारी चार वाजता दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी बैठक होतेय. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत (Mumbai) आणण्यासाठी शिंदे गटाची तयारी सुरु झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *