भारताविरुद्धचा पराभव ऑस्ट्रेलियाला झोंबला; टी-२० वर्ल्डकपच्या आधी फिंचची हकालपट्टी? नवा कर्णधार म्हणून…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । टी-२० वर्ल्डकपच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव झाला. मालिकेतील पहिली लढतीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मालिका गमवावी लागली. गेल्या वर्षी २०२१ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने मिळवले होते. अशा संघाचा वर्ल्डकप तोंडावर आला असताना अशी खराब कामगिरी होणे निश्चित चांगले नाही.

भारताविरुद्धच्या मालिका पराभवानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. जर ऑस्ट्रेलियाचा नियमीत कर्णधार एरॉन फिंचला दुखापत झाली किंवा त्याचा फॉर्म खराब फॉर्म कायम राहिला तर बोर्ड मोठा आणि धाडसी निर्णय घेऊ शकते. फिंचची कामगिरी खराब झाली तर पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी विकेटकीपर आणि फलंदाज मॅथ्यू वेडकडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. सिडनी मॉर्निंग हेराल्डने मंगळवारी याबाबतचे वृत्त दिले आहे.

वेडला ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करण्यास तेव्हा सांगितले होते जेव्हा २०२० मध्ये फिंच संघाबाहेर होता. तेव्हा सिडनी मैदानावर भारताविरुद्ध झालेल्या एका टी-२० सामन्यात त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आले होते. मात्र तेव्हा अनुशासनात्मक गोष्टी त्याच्या विरोधात गेल्या होत्या. वेडचे नाव अशा वेळी समोर आले आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या नावाची चर्चा होती. फिंचने काही दिवसांपूर्वी निवृत्ती घेतली होती आता त्याच्या जागी वनडेसाठी नव्या कर्णधाराचा शोध सुरू आहे.

जर क्रिकेट ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर-नोव्हेंबरनंतर फिंचचा पर्याय शोधत असेल तर वेडचे नाव आघाडीवर असेल, असे या वृत्तात म्हटले आहे. वेड अद्याप बोर्डाच्या केंद्रीय करारात देखील नाही. नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसह १२ सामन्यासाठी त्याला फक्त ३ लाख ५० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर मिळणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत वेडने दमदार फलंदाजी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *