PFI Ban : ‘केंद्राने योग्य निर्णय घेतला…’, PFIवर घातलेल्या बंदीचे मुख्यमंत्री शिंदेंनी केले स्वागत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर पाच वर्षांची बंदी घालत केंद्र सरकारने ( Chief Minister Eknath Shinde Reaction PFI Ban ) मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘पीएफआय’वरील कारवाईचं स्वागत केलं आहे. PFI सारख्या देश विघातक संघटना आहेत. त्यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पंचवटी येथील स्वामी नारायण मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

PFI सारख्या देश विघातक संघटना आहेत आणि त्याचा चोख बंदोबस्त केला पाहिजे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. PFIवर बंदी घातली ती योग्य आहे. पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र आणि राज्य सरकारचा गृहविभाग लक्ष ठेऊन आहे. देशात राष्ट्रद्रोही, देशद्रोही विचार कोणाला पसरवू दिले जाणार नाही. राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झाले आहे. सर्वांना घेऊन पुढे जाईल आणि सर्वांचा सर्वांगीण निर्णय होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *