‘…असं कुणालाही काही वाटेल, ते आम्ही करणार नाही’ ; मुख्यमंत्री शिंदेंनी छगन भुजबळांना सुनावलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ सप्टेंबर । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरस्वतीच्या फोटोवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ( CM Eknath Shinde Slam Chhagan Bhujbal ) टोला लगावत भूमिका स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. आता नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी भुजबळांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

शाळेमधून सरस्वतीचा फोटो काढला जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. शाळेमधून सरस्वतीचा फोटो काढला जाणार नाही. असं कुणालाही काही वाटेल, पण ते आम्ही करणार नाही. जनतेला जे वाटेल, जे योग्य आहे, तेच केले जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे भुजबळांचे आक्षेपार्ह वक्तव्य?
‘शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे फोटो लावले पाहिजेत. कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला. परंतु, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?, असे वादग्रस्त वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

भुजबळ फार्मबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
वादग्रस्त वक्तव्यानंतर छगन भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर भुजबळांनी केलेल्या या विधानावरून वातावरण तापल्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नाशिक पोलिसांकडून खबरदारी देखील घेतली जात आहे. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *