महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । दसरा मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अश्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. आमचा दसरा मेळावा हा गद्दारी विरुद्ध खुद्दारी असाच असेल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. आमचा प्रत्येक शिवसैनिक स्वाभिमानी, स्वतःच्या पैशाने कमवलेली कष्टाची भाकरी खाऊन तो चालत मुंबईला येणार, असंही त्या म्हणाल्या.