पुण्यातील CNG Pump उद्या राहणार बंद; PDAने दिली माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । पुण्यातील 60 हून अधिक CNG पंप उद्या (शनिवारी) बंद राहणार असल्याची माहिती आहे. पेट्रोल डीलर असोसिएशनने 1 ऑक्टोबर रोजी NO SALE बद्दल 7 दिवसांपूर्वी Torrent आणि OMC ला कळवले होते परंतु त्यावर त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे उद्या पुण्यातीलसर्व CNG पंप एका दिवसासाठी बंद राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये जारी केलेल्या MOPNG परिपत्रकानुसार डीलर्सना त्यांच्या ट्रेड मार्जिनमधील पुनरावृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डीलर्सकडून वंचित ठेवलेल्या टोरेंट गॅसकडून त्यांचा हक्क आणि वाजवी मार्जिन या मागणीसाठी पेट्रोल डीलर असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. तर मागण्या मान्य केल्या नसल्याने 1 ऑक्टोबर रोजी पंपांवर टोरेंट सीएनजीची विक्री न करण्यावर विक्रेते ठाम आहेत.

कंपनीकडून व्याजासह विलंबित कमिशनची थकबाकी देण्याची व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. पुण्यात जवळपास 60 हून अधिक CNG पंप असून उद्या या बंदमुळे अनेक रिक्षा आणि कॅब चालकांना याचा फटका बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *