महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमाणाची साखळी तोडण्यासाठी 25 मार्चपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन (Lockdown) आहे. लॉकडाऊनच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने कठोर निर्बंध लादले आहेत. 3 मे रोजी लॉकडाऊनचा शेवटची दिवस आहे. 4 मेपासून संचारबंदीतून सूट मिळेल, अशी अपेक्षा प्रत्येक नागरिकाला आहे. मात्र, 4 मेनंतर काही झोनमध्ये मिळणारी सूट देशातील महानगरांमध्ये (Metropolitan City) मिळणार नसल्याचं केंद्र सरकारने याआधीच घोषित केलं आहे. आता तर केंद्र सरकारने देशातील रेड झोनची नवी यादी जाहीर केली आहे.
कोविड 19 अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, चाचणीचे प्रमाणाचा आधार घेत केंद्र सरकारने देशभरात 130 रेड झोन, 244 ऑरेज झोन, 319 ग्रीन झोन निर्धारित केले आहेत. त्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरचाही समावेश आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या नव्या आदेशानुसार दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरु आणि अहमदाबाद या महानगरांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. रेड झोनमध्ये समावेश असलेल्या महानगरांना 4 मेनंतरही लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहतील. त्यांना कोणत्याही प्रकारची सूट मिळण्याची शक्यता कमीच आहे. रेड झोनमध्ये असलेल्या नागरिकांना सरकारने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे.
रेड झोन (Red Zone):
– मुंबई (Mumbai)
– पुणे (Pune)
– ठाणे (Thane)
– नाशिक (Nashik)
-पालघर (Palghar)
– नागपूर (Nagpur)
– सोलापूर (Solapur)
– यवतमाळ (Yavatmal)
– औरंगाबाद (Aurangabad)
– सातारा (Satara)
– धुळे (Dhule)
– अकोला (Akola)
– जळगाव (Jalgaon)
– मुंबई उपनगर ( Mumbai Suburban)
हेही वाचा.. ‘या’ तारखेपर्यंत कमी होणार कोरोनाचा प्रसार, मराठमोळ्या संशोधकांचा नवा अंदाज
ऑरेंज झोन (Orange Zone)
- रायगड (Raigad)
– अहमदनगर (Ahmednagar)
– अमरावती (Amravati)
– बुलडाणा (Buldhana)
– नंदुरबार (Nandurbar)
– कोल्हापूर (Kolhapur)
– हिंगोली (Hingoli)
– रत्नागिरी (Ratnagiri)
– जालना (Jalna)
– नांदेड (Nanded)
– चंद्रपूर (Chandrapur)
– परभणी (Parbhani)
– सांगली (Sangli)
– लातूर (Latur)
-भंडारा ( Bhandara)
– बीड ( Beed)
Green Zone:
– उस्मानाबाद (Osmanabad)
– वाशिम (Washim)
-सिंधूदुर्ग (Sindhudurg)
– गोंदियाया (Gandia)
– गडचिरोली (Gadchiroli)
– वर्धा ( Wardha)