मनसेकडून आता मदरसे लक्ष्य; राज्य सरकारकडे सर्वेक्षणाची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता राज्यातील अनधिकृत मदरशांविरोधात आंदोलन जाहीर केले आहे. राज्यातील अनेक मदरशांमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप करीत राज्य सरकारने या मदरशांचे तत्काळ सर्वेक्षण करावे आणि अनधिकृत मदरसे बंद करावेत, अशी आग्रही मागणी पक्षाने शुक्रवारी केली. तसेच सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मनसे मदरसे बंद करण्याची मोहीम सुरू करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मनसेचे प्रवक्ते यशवंत चिले यांनी पत्रकार परिषदेत वरील मागणी केली. त्यावेळी त्यांनी रहिवासी इमारतीमध्येही मदरसे उभारले गेले असल्याचा आरोप केला. यासंदर्भात मनसेकडे तक्रार आल्यानंतरच आपण हा आरोप करीत असल्याचे चिले यांनी सांगितले. हिंदूबहुल भागात जाणीवपूर्वक असे मदरसे उभारले जात असून, असे भाग मुस्लिमबहुल बनवण्यासाठीचे हे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

विश्व हिंदू परिषदेचे नेते राज ठाकरेंच्या भेटीला
विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकर गायकर आणि प्रशांत पोळ यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. येत्या काळात राज यांनी आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *