वर्ल्डकपच्या आधी पाकिस्तान गोलंदाजीची पीस काढली ; टी-२०मध्ये अशी मानहानी कोणाचीच झाली नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील सहावी मॅच लाहोर येथे झाली. इंग्लंडचा कर्णधार मोईन अलीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने दिलेल्या विजयाचे लक्ष्य इंग्लंडने ८ विकेट आणि ३३ चेंडू राखून पार केले. या विजयासह इंग्लंडने मालिकेत ३-३ अशी बरोबरी देखील केली. पाकिस्तानला कर्णधार बाबर आझमची खेळी महागात पडली.

सहाव्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने मोहम्मद रिझवानला विश्रांती दिली होती. त्याच्या जागी मोहम्मद हारिसला स्थान देण्यात आले होते. पण तो फक्त ७ धावा करू शकला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ६ बाद १६९ असी धावसंख्या उभी केली. आझमने ८७ धावा केल्या, पण त्यासाठी ५९ चेंडू घेतले. २० षटके फलंदाजी करून त्याला फक्त ७ चौकार आणि ३ षटकार मारता आले.

बाबरच्या या खेळीत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या ३ हजार धावा देखील पूर्ण झाल्या. ८१व्या डावात त्याने ही कामगिरी केली. सर्वात वेगाने ३ हजार धावा करण्याबाबत बाबरने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

विजयासाठी १७० धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली. एलेक्स हेल्स आणि फिलिप सॉल्ट यांनी फक्त २३ चेंडूत ५५ धावांची भागिदारी केली. हेल्स १२ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच ८२ धावा केल्या आणि १५व्या षटकात मॅच देखील जिंकली. सॉल्टने ४१ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८७ धावा केल्या. तर डेव्हिड मलानने १८ चेंडूत २६ धावा आणि बेन डकलेटने १६ चेंडूत २६ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *