T20 World Cup नंतर भारतीय संघातून ‘हा’ खेळाडू निवृत्ती घेणार ?

 77 total views

 

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने (Team India) जोरदार तयारी केली आहे. पण एक स्टार खेळाडू आहे जो भारतीय संघासाठी शेवटचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) खेळणार आहे. यानंतर हा खेळाडू निवृत्तीची घोषणा करू शकतो. चला जाणून घेऊया या खेळाडूबद्दल. (t20 world cup 2022 dinesh karthik may play last world cup finisher wicketkeeper )

दिनेश कार्तिक (dinesh kartik) 2007 साली एमएस धोनीच्या (ms dhoni) नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या T20 संघाचा भाग होता. 15 वर्षांनंतर आता दिनेश कार्तिक पुन्हा T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात परतला आहे. कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये धमाका दाखवला आणि टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. तेव्हापासून त्याने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे.

दिनेश कार्तिक (dinesh kartik) हा भारतीय संघातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आहे. तीन वर्षांनंतर तो टीम इंडियात (Team India) परतला आहे. त्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. टीम इंडियाने 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावावे अशी त्याची इच्छा आहे. कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी ऋषभ पंतकडून (Rishabh Pant) खडतर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर तो निळ्या जर्सीला अलविदा म्हणू शकतो.

T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता
दिनेश कार्तिक 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. कार्तिक भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने भारतासाठी 26 कसोटी सामन्यांमध्ये 1026 धावा, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा आणि 51 टी-20 सामन्यात 598 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये केली होती चांगली कामगिरी
आयपीएल (IPL) 2022 व्यतिरिक्त, कार्तिकने मागच्या काही दिवसात भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. भारतीय संघात परतल्यानंतर दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिले अर्धशतक झळकावले होते. त्‍याच्‍या अनुभवाचा भारताला 2022च्‍या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत चांगला उपयोग होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.