महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ ऑक्टोबर । वाल्हेकरवाडी :- येथील मोनीबाबा वृध्द आनंद आश्रमात कै. नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठान तर्फे लोक सहभागातून आश्रमातील वृध्द महिलांना नवीन साड्या वाटप करण्यात आल्या कै. नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठान तर्फे व्हाट्सअप द्वारे नागरिकांना नवदुर्गा साडी अर्पण महोत्सव २०२२ नवीन किवा जुन्या साड्या द्या असे अहवान केले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला मिळालेल्या प्रतिसादाने भोजने कुटुंब भारावून गेले नागरिकांनी अक्षरशः नवीन भारीच्या साड्या अणुन दिल्या नवीन जुन्या मिळुन ७५ साड्या जमा झाल्या होत्या सोबत अलेल्या महिलांच्या साड्या वाटप करताना डोळ्यातुन अश्रू वाहत होते.
सौ. प्रभा दुर्गे यांनी वृध्द महिला सोबत गाणे व नृत्य केले यावेळी सौ. रेणुकाताई भोजने सौ. धनश्री डिंबळे सौ. शुभांगी मदने सौ. प्रभाताई दुर्गे श्री कमलजीत सिंग , श्री दिपक भोजने श्री शिवाजी अवारे श्री गणेश भोजने , श्री राहुल मदने , उपस्थित होते सौ रेणुका भोजने , दिपक भोजने यांनी सहकार्य केल्याबद्दल साड्या दिलेल्या व मोनीबाबा अश्रामातील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले भोजने कुटुंब नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात करोना काळात धान्य, मास्क वाटप , मुलाच्या वाढदिवसानिमित्त वसतिगृहात धान्य वाटप , रक्तदान शिबीर, शासकीय योजना व इतर कार्यक्रम आयोजन करत असतात याबद्दल नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन व आभार मानत आहे.