शिंदेच्या मंचावर बाळासाहेबांची खुर्ची, तर उद्धव ठाकरेंच्या मंचावर ‘या’ नेत्याला मान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ ऑक्टोबर । दसरा मेळाव्याला (Dussehra Melava) सुरुवात होण्यास काही तासच उरले आहेत. या मेळाव्याच्या काही तासांपुर्वीच शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांच्या मंचावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची खुर्ची ठेवण्यात येणार आहे. या खुर्चीमागे बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे नेहमी सावली सारखा फिरणारा थापा उभा राहणार आहे. विशेष म्हणजे या खुर्चीला एक वेगळा इतिहास देखील आहे. ठाण्यात ज्या खुर्चीवर बसून बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटचं भाषण दिलं होतं, ती खुर्ची शिंदेच्या मंचावर ठेवली जाणार आहे. या खुर्चीमागे बाळासाहेब यांच्या विचाराने पक्ष प्रेरीत असल्याचा संदेश देताना मुख्यमंत्री शिंदे (Cm Eknath shinde) दिसत आहे.

दरम्यान ऐन मेळाव्याच्या काही तासपुर्वी ठाकरे गटाला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांनी रचलेली ही नवीन रणनीती आहे. एकनाथ शिंदे यांच्या या खेळीने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंच्या मंचावर ‘या’ नेत्याला स्थान
एकीकडे शिंदे गटाच्या (Shinde Group) मंचावर बाळासाहेब यांची खुर्ची ठेवण्यात येत असतानाचं, दुसरीकडे ठाकरे गटाच्या (Thackeray Group) मंचावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची रिकामी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. संजय राऊत संध्या ईडीच्या कारवाईमुळे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांची खुर्ची रिकामी ठेवली जाणार आहे. दरम्यान याआधी सुद्धा नेस्को मैदानावर झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांची रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती.

दरम्यान आता शिवसेनेच्या दोन स्वतंत्र दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार, याकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *